Popular Posts

Wednesday, May 25, 2011

तुमचे आशीर्वाद हवेत....



आज पहिल्यांदा रिलिज झालेला सिनेमा पाहिला. खूप वेगळा अनुभव होता तो. पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात मध्यंतरात २०.२५ लोक फोटो घ्यायला. सह्या घेण्यासाठी पुढे झाले. मी खूप भारावले.
पहिल्याच चित्रपटात काम केल्याचा हा अनुभव थ्रिलिंग होता. प्रेक्षकांना माझे काम आवडल्याचे ते म्हणत होते.
मी मनात आनंदाने नाचत होते. ते येऊन माझ्याशी बोलत होते. कामाची प्रशंसा करीत होते.
सार्थकी, समाधानाची भावना मनात भरून येत होती.

त्यांच्या चेह-यावरचा आनंद. त्यांना चित्रपट आवडल्याचे सांगतानाही खूप छान वाटले.
आज मनात होते ते काही प्रमाणात का होईना प्रत्यक्षात उतरल्याचे सूख पहात होते.
तेच मला पुढे नेणार आहे.

करीयरचा ग्राफ आता कुठे वर येतोय असे वाटले. ते आता अर्थपूर्ण बनावयला हवे.
खरे म्हणायचे तर मी विनोदी, रोँमॅंटिक, कौटुंबिक अशी सर्वच प्रकारची कामे करू शकेन याची खात्री आहे. पण पांगिरा ही त्याची पहिली सुरवात आहे. स्टेप बाय स्टेप...पुढे जायचे आहे.
वेगळ्या भाषेतही काम करण्याची इच्छा आहे. शिवाय बॉलिबूड तर खुणावतय. तिथेही एंट्री व्हाय़ला हवी..
तसे प्रयत्न सुरू आहेत.

तशी मी मध्यमवर्गीय कुटुंबातली. वडील बॅंकेत. मला अभिनयाची हौस. त्यातच करियर करायचे आहे.
आत्तापर्य़ंत शंभराचेवर जाहिरातपटात काम केले. पण फिचर फिल्म करायची पहिली संधी राजीव पाटील यांच्यामुळे मिळाली. पांगिरासारख्या वेगळ्या चित्रपटाने मला माझी इमेज दिली. मी काही चांगले नक्की करू शकते याचा विश्वास दिला.
चांगल्या कलाकृतीतून दिसण्याचा माझा प्रयत्न राहिल. दर्जाही सांभाळेन. परफेक्शनी काम करण्याची इच्छा आहे...
ते कठीण..पण मी ते नक्की करेन याची खात्री आहे,
म्हणूनच जिद्दीने करणार आहे.

शेवटी एकच सांगेन
I am strong
I am slow
I am with the Road

मी योग्य मार्गावर चालले आहे.

तुमचे आशीर्वाद हवेत....


मीता सावरकर, मुंबई

email_ meetasawarkar@gmail.com